डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधू आज संध्याकाळी महिला एकेरी प्रकाराच्या पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या पै यू पो हिच्याशी लढत देईल. तर पुरुष दुहेरी प्रकारात भारताचा लक्ष्य सेन याची लढत चीनच्या लू गुआंग झू विरुद्ध होईल. महिला दुहेरी प्रकारात रुतपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा या दोघी चांग चिंग हुई आणि यांग चिंग तुन या चिनी तैपेई जोडीशी झुंज देतील. तर मिश्र दुहेरी प्रकारात आज संध्याकाळी सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वरियाथ यांची इंडोनेशियाच्या रेहान नौफल कुशारजांतो आणि लिसा आयु कुसुमावती यांच्याशी लढत होईल.