डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं – डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन

अमेरिकेच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या परस्पर हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असं मत डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका ग्रीनलंड मध्ये दाखवत असलेल्या वाढत्या धोरणात्मक स्वारस्याला अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दुजोरा दिल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रेडरिकसेन यांनी हे विधान केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ग्रीनलंड अत्यंत महत्वाचा असून अमेरिका आपल्या हिताचं रक्षण करेल, असं व्हान्स यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा