दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली असून आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सरासरी ए क्यू आय अर्थात वायू गुणवत्ता निर्देशांक ३८५ इतका झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार दिल्लीच्या काही भागांत वातावरण अत्यंत खराब म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक ४०० इतक्या निचांकी पातळीपर्यंत घसरला आहे. दिल्लीच्या आनंद विहार भागात हा निर्देशांक ४८० पर्यंत खालावला असून, निर्देशांकात नेहरू नगर इथं ४४८, पतापरगंज इथं ४४२, पंजाबी बाग ४२३, जहांगीरपुरी ४१९, अशोक विहार ४१४ तर आय टी ओ इथं ४०२ पर्यंत घसरण झाली आहे.
Site Admin | January 4, 2025 3:06 PM | Air quality | Delhi Air Quality | Delhi's | substandard levels
दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली
