दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन म्हणजेच रायझिंग डे आज उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्या उपस्थितीत पोलिसांनी राय यांना मानवंदना दिली. देशातील सर्वोत्तम पोलीसदलात दिल्ली पोलिसांचा समावेश होतो असं राय यांनी यावेळी सांगितलं. जी ट्वेंटी शिखर परिषद तसंच कोविड महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यानी प्रशंसा केली. सायबरगुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी भारतीय सायबरगुन्हे समन्वय केंद्र -14 सी स्थापनेच्या कामी दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेखही राय यांनी यावेळी केला, किंग्जवे कॅम्प परेड मैदानावर दिल्ली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
Site Admin | February 16, 2025 1:32 PM | 78th Raising Day | Delhi Police
दिल्ली पोलिस विभागाचा ७८वा स्थापना दिन
