राजधानी नवी दिल्लीत आज पहाटे पाच वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे झटके बसले. त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीजवळ धौल कुवा इथं पाच किलोमीटर खोलीवर होता. यात जीवित अथवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही.
बिहारच्या सिवान आणि आसपासच्या जिल्ह्यातही आज सकाळी भूकंपाचे धक्के बसले. आज सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंप मापकावर त्याची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू सिवानपासून १० किलो मीटर अंतरावर असल्याची माहिती पटणा इथल्या भारतीय हवामान विज्ञान विभागानं दिली.