दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा प्रस्ताव आणि अंतर्गत चौकशी प्रक्रिया या दोन गोष्टी स्वतंत्र असल्याचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं निवेदनाद्वारे दिलं आहे.
न्यायमूर्ती वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात बेहिशोबी रोख रक्कम सापडली होती. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांनी अंतर्गत चौकशी सुरू केल्याचं आणि या चौकशीचा अहवाल आजच सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यासमोर सादर करणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यानुसार न्यायालय पुढचे निर्णय घेईल.