दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला. या अहवालात छायाचित्रं आणि चित्रफितींचाही समावेश आहे.
या प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांचं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयानं प्रसिद्ध केलं. वर्मा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही घरातल्या कोणत्याही स्टोअररूमध्ये रोख रक्कम ठेवलेली नाही, ज्या खोलीत ही रोख रक्कम सापडली, ते आऊटहाऊस असून ते आणि त्यांचं कुटुंब राहात असलेल्या मुख्य घरापासून वेगळं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जी. एस. संधवालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती अनू शिवरामन हे या समितीचे सदस्य आहेत. दरम्यान, न्यायमूर्ती वर्मा यांना कोणतंही न्यायालयीन काम न देण्याचे निर्देश सरन्यायाधीश खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिले आहेत.