दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यावर ५ वर्षात १५ आश्वासनं पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यात महिलांना दरमहा २१०० रुपयांची आर्थिक मदत, रोजगार निर्मिती, वैद्यकीय उपचारांसाठी संजीवनी योजना आणि थकित पाणी बिल माफ करणं यासारख्या घोषणांचा समावेश आहे. भाजपा आणि काँग्रेस दिल्लीतल्या नागरिकांना खोटी आश्वासनं देत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान आम आदमी पक्षानं यापूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं लोकांनी त्यांना आधीच नाकारलं असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं जाहीरनाम्यावर दिली आहे.
Site Admin | January 27, 2025 2:55 PM | Aam Aadmi Party | Delhi Election
दिल्ली निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा जाहीर
