दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत एकाला अटक केली असून दोन किलोहून अधिक उच्च प्रतीचा चरस जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत गेल्या १५ दिवसांत सुमारे ५५ किलो गांजा, ७ हजार ८०० क्वार्टर अवैध दारू, दोन किलोहून अधिक चरस आणि ११ ग्रॅम स्मैक जप्त करण्यात आली आहे.
Site Admin | December 7, 2024 7:42 PM | Delhi Police
आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत दिल्ली पोलिसांकडून एकाला अटक
