जम्मू आणि काश्मीरचे खासदार शेख अब्दुल रशीद यांची संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहण्याची परवानगी मागणारी पॅरोल याचिका दिल्लीतल्या एका न्यायालयाने आज फेटाळली. रशीद २०१९ पासून तिहार तुरुंगात असून २०१७ च्या दहशतवादी निधी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अटक केली होती.