डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यात नव्या मुख्यमंत्र्याचं नाव निश्चित केलं जाईल, असं केजरीवाल म्हणाले आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुका यंदा नोव्हेंबर महिन्यात घ्याव्यात अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. 

अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा ही फक्त प्रसिद्धीसाठी असल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केली आहे. तर केजरीवाल यांचे प्रामाणिकपणाचे दावे पोकळ असल्याचा आरोप दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा