शेतपिकाला हमीभाव देण्याचा कायदा आणि कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी काढलेला ‘दिल्ली चलो’ मोर्चा आज पुन्हा एकदा स्थगित करण्यात आला. मोर्चेकरी जमावाने शंभू तपासणी नाका ओलांडण्याचा प्रयत्न करीत असताना हरियाणा पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. त्यात काही शेतकरी जखमी झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून गेले १८ दिवस उपोषण करणारे शेतकरी नेते जगजीत सिंग दल्लेवाल यांना वैद्यकीय सहाय्य देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शंभू तपासणी नाक्यावरील या आंदोलनामुळे अंबाला जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच आजपासून १७ डिसेंबरपर्यंत इंटरनेट सेवा करण्यात आली आहे.
Site Admin | December 14, 2024 8:15 PM | chalo dellhi | PANJAB