दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी आज विधानसभेत सादर केला. भाजपाची सत्ता असलेल्या दिल्ली सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्राच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचं अर्थमंत्री रेखा गुप्ता यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना म्हटलं. अर्थसंकल्पात २८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे जी मागील अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ दुप्पट असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेसाठीही अर्थसंकल्पात ५ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिल्लीत शंभर वेगवेगळ्या ठिकाणी अटल कॅन्टीन स्थापन करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणाही त्यांनी केली. दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याच्या २८ तारखेपर्यंत सुरू राहील.
Site Admin | March 25, 2025 3:00 PM | Delhi Budget Session 2025
दिल्लीचा २०२५-२६ वर्षाचा एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
