दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणाच्या वेळी घोषणाबाजी केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आम आदमी पार्टीच्या बारा आमदारांना विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आज निलंबित केलं. गोपाल राय, वीर सिंग धिंगन, मुकेश अहलावत, चौधरी झुबैर अहमद, अनिल झा, विशेष रवी आणि जरनैल सिंग यांचा निलंबन झालेल्या आमदारांमधे समावेश आहे. त्यानंतर निलंबित आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात निदर्शनं केली. मुख्यमंत्री कार्यालयातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र काढून भाजपा सरकारने त्यांचा अपमान केल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.
Site Admin | February 25, 2025 1:33 PM | AAP | Delhi Assembly Session
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ‘आप’च्या १२ आमदारांचं निलंबन
