दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्राचा दुसरा टप्पा भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांसमोर आज जाहीर केला. या संकल्पपत्रात दिल्लीतल्या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी १५ हजार रुपयांची मदत, तसंच दोन वेळचा प्रवास आणि अर्ज शुल्काची परतफेड करण्याचं आश्वासन दिलं आहे. भाजपाचं सरकार आल्यास गरजू विद्यार्थाचं केजीपासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण सरकारी शैक्षणिक संस्थांमार्फत मोफत दिलं जाईल, अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यावेतन योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असं आश्वासन ठाकूर यांनी दिलं. त्याशिवाय १० लाखांचा आयुर्विमा, अपघात विमा आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ५ लाख रुपयांचा वाहन विमा तसंच त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल, असंही या संकल्प पत्रात नमूद आहे.
Site Admin | January 21, 2025 3:32 PM | BJP | Delhi Assembly Elections | Sankalp Patra