दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेतली. किराडी मतदारसंघात जाहीर सभेत त्यांनी दिल्लीतले खराब रस्ते, अस्वच्छता या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीवर टीका केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याही प्रचारसभा झाल्या.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज पक्षाच्या गीताचं अनावरण केलं. यावेळी मद्य घोटाळ्यावरुन त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.