दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपाचे हरिष खुराणा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस नेते संदीप दीक्षित, अरीबा खान यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले. या उमेदवारांसाठी विविध नेत्यांनी रोड शोचे आयोजन केलं होतं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने नऊ उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. काँग्रेसनही पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रवारी रोजी होणार आहे.