दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून या निवडणुका शांततेत आणि विनादबाव पार पडाव्यात याकरिता दिल्ली पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १२३ विनापरवाना हत्यारं, ९२ काडतुसं, १२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून एक कोटी रुपयांहून अधिकच्या रोकडीचाही यात समावेश आहे. ७ जानेवारीला निवडणूक वेळापत्रक घोषित झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सुरक्षेच्या कारणावरून सुमारे ७ हजार ४५४ लोकांना अटक करण्यात आली आहे.मद्य तस्करीवरदेखील पोलिसांनी विशेष कारवाई केली असून दिल्लीच्या सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Site Admin | January 15, 2025 8:35 PM | Delhi Assembly Elections