दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. या निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होईल, १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ तारखेला अर्जांची छाननी होऊन, २० तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
२३ फेब्रुवारीला मुदत संपणाऱ्या दिल्ली विधानसभेत ७० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत त्यातल्या ६२ जागा आम आदमी पार्टीनं तर ८ जागा भाजपानं जिंकल्या होत्या.