निवडणूक आयोग आज दुपारी २ वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० सदस्यांचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षानं यापूर्वीच सर्व विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर भाजपने आतापर्यंत २९ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून आतापर्यंत एकूण ४८ उमेदवारांची घोषणा केली आहे. दिल्लीत १ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात ८३ लाखांहून अधिक पुरुष मतदार, ७१ लाखांहून अधिक महिला मतदार आणि १ हजार २६१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. विकासपुरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख ६२ हजारांहून अधिक मतदार आहेत तर दिल्ली छावणी विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ७८ हजार ८९३ मतदार आहेत. गेल्या दोन महिन्यांत १८ ते १९ वयोगटातल्या ५२ हजारांहून अधिक मतदारांची भर पडली असल्याचं निवडणूक कार्यालयानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
Site Admin | January 7, 2025 1:38 PM | Delhi assembly election program
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज होणार जाहीर
