दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात असून १ कोटी ५६ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला असून, निवडणूक आयोगानं १ लाख ८० हजारापेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले आहेत.
गेल्या २४ तासांत पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना अटक केली असून २५ जणांविरोधात FIR दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ३४० जणांविरोधात, तर अबकारी कर प्रकरणी २७८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, हरियाणा सरकारनं उद्या दिल्लीतल्या नोंदणीकृत मतदारांसाठी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे.