डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांचा प्रचार जोरात सुरू आहे. महत्वाच्या पक्षांचे मोठे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, रोड शो, आणि रॅली काढत आहेत. 

 

भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रोहिणी आणि वझिरपूर  भागात प्रचारसभांना संबोधित केलं. भाजपा सत्तेवर आल्यावर महिलांना अडीच हजार रुपये प्रतिमाह देण्यात येतील असं आश्वासन शहा यांनी दिलं. प्रत्येक गरोदर महिलेला २१ रुपये मदत दिली जाईल, तसंच घरगुती गॅस सिलिंडर पाच हजार रुपयांत उपलब्ध करून दिला जाईल, असंही शहा म्हणाले. 

 

दिल्लीतल्या आप सरकारने मागच्या दहा वर्षात फक्त गोंधळ घातला अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कृष्णनगर इथल्या प्रचारसभेत केली. त्यांनी केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेचा उपयोग केला नसून नागरिकांची दिशाभूल केली असं नड्डा म्हणाले. 

 

दरम्यान, आपचा पराभव करण्यासाठी काँग्रस भाजपासोबत मिळून काम करत आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसला मतदान करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. 

 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमृतपुरी इथल्या प्रचारसभेला संबोधित केलं. आम आदमी पार्टीने दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली असं मान म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा