दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना खोटी आश्वासनं देत त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला आहे. यमुना नदीत होणारं प्रदूषण, दिल्लीतील हवेची ढासळती गुणवत्ता, भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवरून ठाकूर यांनी आप सरकारवर टीका केली.
Site Admin | December 23, 2024 1:17 PM | Delhi Assembly Election