नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंद्र इंद्राज सिंग आणि पंकज सिंग यांच्यासह सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी सर्वांना शपथ दिली. आज दुपारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना सभागृहाला उद्या संबोधित करणार आहेत. मागच्या सरकारच्या कार्यपद्धतीचा अहवाल उद्याच सादर केला जाईल. २७ फेब्रवारी रोजी या अधिवेशनाची सांगता होईल.