भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल अमेरिकेचे नवे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्याशी दोन्ही देशातील संरक्षण सहकार्याबाबत संवाद साधला. राजनाथ सिंह यांनी हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. अमेरिकेचे संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हेगसेथ यांचे त्यांनी अभिनंदन केलं. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण भागीदारी आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहमती व्यक्त केली. तंत्रज्ञान सहकार्य, संरक्षण औद्योगिक पुरवठा साखळींचे एकत्रीकरण, मालवाहतूक, माहितीचं आदानप्रदान आणि संयुक्त लष्करी सराव यावर एकत्र काम करण्याबाबतही सहमती झाली.