भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या, जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयानं आज भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी करार केला. सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. नौदलाच्या अनेक जहाजांवर ही क्षेपणास्त्र यंत्रणा बसवता येण्याजोगी असून, भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या बहुतांश जहाजांवरही ही क्षेपणास्त्र यंत्रणा बसवली जाईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताची संरक्षण क्षमता आणि अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमधे, आजचा करार, हा एक मैलाचा दगड असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | January 16, 2025 8:10 PM | Bharat Dynamics | Defence Ministry
क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी करार
