डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चेन्नई इथं भारतीय तटरक्षक दलाच्या सागरी बचाव समन्वय केंद्राचं उद्घाटन करणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चेन्नई दौऱ्यावर जात आहेत. या भेटीदरम्यान भारतीय तटरक्षक दलाकडून चेन्नईत उभारण्यात आलेल्या नव्या अत्याधुनिक सागरी बचाव समन्वय केंद्राचं तसंच सागरी प्रदुषण प्रतिसाद केंद्र तसंच पुद्दुचरी इथं उभारण्यात आलेलं तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हचं उद्घाटनही सिंह यांच्या होणार आहे. चेन्नईस्थित प्रदुषण केंद्र, सागरी प्रदुषण व्यवस्थापनातलं अग्रगण्य पाऊल आहे. या केंद्रामुळे सागरी प्रदुषणाच्या घटना विशेषतः किनारपट्टीलगतच्या राज्यांमध्ये होणाऱ्या तेल आणि रसायन गळतीच्या घटनांमध्ये प्रतिसाद देण्यात समन्वयाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात मदत होईल. समुद्री सुरक्षा मजबूत करणे तसंच आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्षम प्रतिसाद देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी हे केंद्र सज्ज झालं आहे. या उद्घाटनांनंतर सिंह यांच्या हस्ते दिवंगत एम. करुणानिधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काढण्यात आलेल्या नाण्याचं उद्घाटन करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा