संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह आज मॉस्कोमध्ये भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत. लष्करी सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांचा दोन्ही मंत्री आढावा घेतील. विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही चर्चा होणार आहे. राजनाथसिंह रविवारपासून रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
Site Admin | December 10, 2024 9:54 AM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री अँद्रे बेलुसोव्ह भारत-रशिया आंतर-सरकार लष्कर सहकार्य परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार
