डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारत – अमेरिका दरम्यान महत्त्वाचा संरक्षण करार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.  संरक्षण मंत्र्यांच्या या भेटीत भारत आणि अमेरिकेत पुरवठा सुरक्षा व्यवस्था करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारातून परस्परांना संरक्षण सामग्री पुरवठ्यात प्राधान्य देण्याचं मान्य झालं. 

 

अमेरिकेबरोबर असा करार करणारा भारत हा अठरावा देश आहे.  दोन्ही देशांमध्ये संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.  सध्या आणि भावी काळातल्या संरक्षण विषयक सहयोगासंदर्भात राजनाथ सिंह अमेरिकन संरक्षण उद्योगाबरोबर  उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत

 

राजनाथ सिंह यांनी वॉशिंग्टनमधल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत आणि अमेरिका हे देश नैसर्गीक जोडीदार असून त्यांच्यामध्ये दृढ बंध निर्माण होणे साहजिक आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा