संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत काश्मीर खोऱ्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याच्या स्थितीची माहिती सिंह यांना दिली. हल्ला झालेल्या परिसरात सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. परिसरात शोधमोहीम राबवण्यासाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Site Admin | April 23, 2025 3:18 PM | Defence Minister Rajnath Singh
राजनाथ सिंह यांनी आज काश्मीर खोऱ्यातल्या परिस्थितीचा घेतला आढावा
