डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 65 व्या स्थापना दिवस समारंभात ते काल बोलत होते. भारतीय तरुणांना ‘विकसित भारत’ हा दृष्टिकोन साकार करण्यासाठी देशात आयात होणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास करण्याचं संरक्षणमंत्र्यांनी आवाहन केलं. आयआयटी कानपूरसारख्या संस्था शैक्षणिक इंजिनं असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात ती भारताला गतिशीलता प्रदान करू शकतात असं राजनाथ सिंह म्हणाले.

 

स्वावलंबित्व मिळविण्यासाठी सरकारचे प्रयत्न अत्यंत यशस्वी ठरत असून 10 वर्षांपूर्वी केवळ 600 कोटी रुपयांची असलेली संरक्षण निर्यात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 21 हजार  कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली आहे. सध्या सुरू असलेल्या संघर्षांदरम्यान जगभरातील संरक्षण परिसंस्थेमध्ये तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर सिंह यांनी प्रकाश टाकला. ड्रोन, लेझर युद्ध, सायबर युद्ध, अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि हायपर-सॉनिक क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे  युद्ध तंत्रज्ञानाभिमुख बनलं आहे. संरक्षण स्वावलंबनामध्ये सरकारच्या पूर्ण पाठिंब्याची ग्वाही देत याकामी खाजगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांसह सर्व संबंधितांना सोबत घेण्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा