भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरु असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या काही भागाबद्दल असलेले मतभेद मिटवण्यात त्यांचा उपयोग होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आयोजित झालेल्या ‘चाणक्य संवाद २०२४’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. नियंत्रण रेषेजवळ लष्कराची गस्त आणि गुरांची चराई सुरु राहणं याबाबत दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या विकासात तंत्रज्ञानविषयक सुधारणांबरोबरच सुरक्षा राखण्याचं भारताचं उद्दिष्ट असून शस्त्रास्त्रांचं तसेच इतर सुरक्षा उपकरणांचं उत्पादन स्वदेशात करण्यासाठी भारताच्या सुरु असलेल्या प्रयत्नाचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होतील असं त्यांनी सांगितलं.