डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरकारी वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ

राज्यातली विविध विभागांची वसतीगृहं आणि आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. आदिम जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना राबवण्यासह आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज द्यायलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. राज्यातल्या यंत्रमाग सहकारी संस्थांना राज्य सरकारकडून अर्थसहाय्य द्यायलाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली.

 
राज्य मंत्रिमंडळातील निर्णय : 

 

• विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ.

 

• महिलांच्या सक्षमीकरणासाठी जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम उपक्रम राबविण्यास मान्यता. २६८५ कोटी प्रकल्पास मान्यता. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत कर्ज.

 

• आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज

 

• नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालयास शासकीय भाग भांडवल

 

• महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवेसाठी अध्यादेश

 

• जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण व आधुनिकीकरणाचे शासन धोरण.

 

• पूर्णामाय सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य.

 

• राज्यातील यंत्रमाग सहकारी संस्थांना आता राज्य शासनाकडून अर्थसहाय्य.

 

• आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना

 

• ठाणे पालिकेच्या विविध उपक्रमांसाठी शासकीय जमीन

सर्वाधिक वाचले

सर्व पहा