राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं रस्ता सुरक्षा उपाययोजनांसाठी राष्ट्रीय महामार्गांलगत पशु निवारा गृह सुविधा सुरू करण्याचा पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. प्राण्यांमुळे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावर आढळणारी भटकी गुरं आणि जनावरांची काळजी घेण्याच्या दृष्टिनं हा निर्णय घेतल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. अशा प्रकारचा पहिला प्रकल्प उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात येणार आहे.
Site Admin | December 25, 2024 12:26 PM