डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लोकसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा

लोकसभेचं कामकाज आज २०२४-२५ साठीच्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेनं सुरु झालं. चर्चेत भाग घेताना भाजपाचे जुगल किशोर म्हणाले की, हा अर्थसंकल्प आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा असून, तो जनतेसाठी फायद्याचा ठरेल. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सरकार देशाला स्वावलंबी बनवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असल्याचं पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह म्हणाले. हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश केंद्रित असल्याचा विरोधकांचा दावा त्यांनी फेटाळून लावला. 

 

केंद्रसरकार हरियाणामधल्या प्रलंबित प्रकल्पांना महत्व देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे जय प्रकाश यांनी केला.  शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत मूल्याचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की,  सरकारने या मुद्द्याचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, मात्र अनेक शेतकरी संघटनांना त्यामधून वगळण्यात आलं आहे.  

 

अर्थसंकल्पात हिमाचल प्रदेशला सहाय्य केल्याबद्दल भाजपाच्या कंगना रनौत यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. 

 

हा अर्थसंकल्प युवा, महिला, शेतकरी आणि गरिबांच्या फायद्याचा नसल्याचं आम आदमी पार्टीसाजे गुरमीत सिंह म्हणाले.  

 

महागाईने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता दूर करण्यात अर्थसंकल्प अपयशी ठरल्याची टीका शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा