संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळं झालेल्या गदारोळामुळं लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झालं होतं. सध्या लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.