देशात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ६० टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातल्या व्यक्तींचे असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत रस्ते सुरक्षाविषय तंत्रज्ञानातील भारत आणि अमेरिकेतल्या भागिदारीविषयक कार्यक्रमात बोलत होते. रस्ते अपघातांमुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचं तीन टक्के नुकसान होत असल्याचं ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना वाहतूक विषयक नियम आणि कायद्यांची माहिती व्हावी यासाठी शाळांनी आपल्या अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षाविषयक