सिरियातल्या किनारी भागात लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या लढाईत मरण पावलेल्यांची संख्या पाचशेवर पोहोचली आहे. यात १२० बंडखोर तसंच ९३ लष्करी जवान मरण पावल्याचं ब्रिटनमधल्या सिरियन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेनं म्हटलं आहे. बशर अल असद यांच्या सशस्त्र समर्थकांनी सरकारविरोधात बंडखोरी केल्यामुळे ही लढाई सुरू झाली आहे. या हल्ल्यात ३३० नागरिक मृत्यूमुखी पडल्याचंही या संस्थेनं म्हटलं आहे.
Site Admin | March 8, 2025 8:40 PM | Syria
सिरियातल्या लष्कर आणि बंडखोर यांच्या संघर्षात मृतांची संख्या पाचशेवर
