जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास समिती स्थापन केली आहे. काल सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला होता.
Site Admin | December 21, 2024 2:34 PM | Gas Leak | Jaipur