महाराष्ट्र राज्य सरकारच्या ६१ व्या मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिका सादर करायला मुदतवाढ देण्यात आली असून निर्माते २७ डिसेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करु शकतील असं महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी म्हटलं आहे.
१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी प्रवेशिका महामंडळाच्या filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संजीवन पुणे कौस्तुभ
पुणे जिल्ह्यात देवाची आळंदी इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहला उत्साहात पार पाडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत आले होते. यानिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याआधी आज सकाळी माऊलींच्या समाधीस्थळी आरती आणि दुग्धाभिषेक करण्यात आला.