कांद्यावरचं २० टक्के निर्यात शुल्क कमी करण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून एक निश्चित धोरण आखू आणि याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिलं. छगन भुजबळ, रोहित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. कांद्याला २ हजार २५० रुपये किमान हमीभाव द्यावा अशी मागणी भुजबळ यांनी केली.
यावर, या मागणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असं सरकारनं सांगितलं. कांद्याची देशांतर्गत निर्यात वाढवण्याचा तसंच कांदा चाळी वाढवण्याचा प्रयत्न करू, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.