मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, किंवा एसटीच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत, कुठल्याही योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ते नागपूरमध्ये कन्हान इथं एका जाहीर सभेपूर्वी बातमीदारांशी बोलत होते. ज्या पक्षप्रमुखांनी इमानदार नेत्यांना धक्का देऊन पक्षाबाहेर काढल, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला धक्का दिला, त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत धक्का देऊन घरी बसवलं, अशी टीका त्यांनी केली.
गोंदिया जिल्ह्यात देवरी इथं आयोजित आभार सभेला एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडलं. ते लोकसभेत हरले, विधानसभेत हरले आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही त्याचा पराभव होईल, असं ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सहसराम करोटे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.