मराठी भाषा विभागानं मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मराठी भाषा विभागाची बैठक आज मुंबईत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही शिंदे यांनी केली. मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तकं प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
Site Admin | February 17, 2025 8:50 PM | DCM Eknath Shinde
मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावं-एकनाथ शिंदे
