ठाण्यातल्या खोपट बसस्थानकावरच्या चालक वाहकांसाठीच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. या विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभरात राबवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. एस्टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच इश्वर सेवा असं मानून काम करावं, असं सांगत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन समर्थ आहे, अशी ग्वाही दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Site Admin | February 9, 2025 7:48 PM | DCM Eknath Shinde
ठाण्यातल्या चालक-वाहकांसाठीच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
