डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गोंदियातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा-गोरेगाव मतदार संघातली ७५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्यानं हा मतदारसंघ सुजलाम्-सुफलाम् होणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रातल्या धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ५ हजार २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांचं तसंच, तिरोडा नगर परिषद आणि गोरेगाव नगर पंचायत क्षेत्रातल्या २०५ कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

 

आमदार विजय रहांगडाले यांची फडणवीस यांनी या कार्यक्रमात प्रशंसा केली. विरोधक विदर्भासाठी निधी देत नव्हते, आमच्या सरकारने सिंचनाकरिता निधी दिल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असल्याचं सांगितलं. तसंच पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही अशी व्यवस्था केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा