मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडाच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीतं ते बोलत होते. क्रीडा विभागामार्फत ही तिन्ही मैदानं खेळांच्या क्लबला भाडेपट्टा करारानं देण्यात येतात. या क्लबचा भाडेपट्टा करार संपला असून महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास या चारही विभागांनी विहित वेळेत भाडेपट्टा करारासाठीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. या तिन्ही मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.
Site Admin | February 21, 2025 7:48 PM | DCM Ajit Pawar | Playground
मैदान भूखंडांच्या भाडेपट्टा कराराच्या नूतनीकरणासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक
