डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका

राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीनं ईव्हीएमला दोष दिला नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली. बारामतीच्या मतदारांनी एक लाखापेक्षा जास्त मतांच्या फरकानं आपल्याला निवडून दिलं, त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे, असं सांगून बारामतीच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा