राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मदत २१०० रुपये करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथं दिलं. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट करत राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.