चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा इथल्या आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी राज्य सरकारनं दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे निर्देश दिल्यानंतर ताबडतोब त्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली. कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १ कोटी ८६ लाख रुपये तर, “आनंद अंध, मुकबधीर” आणि “संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळे”साठी १ कोटी २२ लाख रुपये, अशा निधीचा समावेश आहे.
Site Admin | January 14, 2025 8:55 PM | DCM Ajit Pawar
आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी
