राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत आज वरूड इथं ते बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत विदर्भातले कापूस, सोयाबीन, संत्री उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख त्यांनी केला. कांदा निर्यातबंदी होऊ नये, सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
Site Admin | September 2, 2024 3:55 PM | ajit pawar
विधानसभेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
